गडचिरोली: तालुक्यातील वन्यप्राणी वाघाच्या हल्ल्यात रामभाऊ रावजी बावनवाडे यांचा बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली.आज रोजी नियतक्षेत्र आंबेशिवणी येथील वनक्षेत्रात मौजा आंबेटोला येथील रामभाऊ बावनवाडे यांच्या पाळीव बैलावर वन्यप्राणी वाघाने हल्ला करून ठार केले.
घटनेची माहीती मिळताच क्षेत्रसहाय्यक अमिर्झा श्री.तांबे वनरक्षक आंबेडारे हे घटनास्थळी पोहचून सदर घटनेबाबत मोका चौकशी करून पंचनामा नोंदविला.आणि सदरच्या घटनेबाबत आजूबाजूच्या गावात माहीती देऊन दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.