कोरची तालुक्यातील कोटगुल येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची कोटगुल क्षेत्रिय कार्यकारिणी गठीत | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Korchi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli,Gadchiroli Live News,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची प्रतिनिधी-
आज दिनांक 10 डिसेंबर 2023 ला कोटगुल येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची क्षेत्रीय शाखा गठित करण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नागपूरचे विभागीय अध्यक्ष तथा राज्य संघटक आयु. विजय बन्सोड सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव हंसराज लांडगे सर, देसाईगंज उपविभागीय अध्यक्ष आनंदराव मेश्राम, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोरची तालुका अध्यक्ष किशोर साखरे, तालुका कोषाध्यक्ष रमेश शहारे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर अंबादे, सचिव चंद्रशेखर वालदे, सहसचिव चेतन कराडे व सामाजिक कार्यकर्ते रोशन रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम सिद्धार्थ गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्रीशरण पंचशील घेण्यात आले. आयु. विजय बन्सोड सर यांनी मार्गदर्शनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पार्श्वभूमी, कार्य व  धम्माचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.

या कोटगुल क्षेत्रातील कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून अंतराम झाडूजी टेंभुर्णे रा. कोसमी यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव म्हणून नामदेव झाडूराम मेश्राम कोटगुल, तर कार्याध्यक्ष अनिल रामलाल जनबंधू ढोलडोंगरी, कोषाध्यक्ष चंद्रशेखर बिरसिंग उमरे नांगपूर, उपाध्यक्ष सामसाय गोकुळ टेंभुर्णे देऊळभट्टी, उपाध्यक्षा प्रतिमा मुकुंद टेंभुर्णे वाको, सहसचिव गिरीजा सुरेश डोंगरे वाको, महिला संघटक निशा सचिन टेंभुर्णे कोसमी, संस्कार प्रमुख भाविका नामदेव टेंभुर्णे, प्रवक्ता बिरसिंग धर्मा उमरे कोटगुल, प्रसिद्धी प्रमुख मुकेश हिरालाल राहुल कोटगुल, सल्लागार आनंदराव महागुजी राहुल कोटगुल, सदस्या सुजाता योगेश बोदेले अलोंडी, सदस्य राजकुमार सुकलाल टेंभुर्णे कामेली, सदस्य दीपक चेतन चौधरी बडीमाधे, सदस्या मंदा रविंद्र टेंभुर्णे कोसमी यांची निवड करण्यात आली.

               या सभेचे संचालन आनंदराव मेश्राम सर, प्रास्ताविक रमेश शहारे सर तर आभार चेतन कराडे यांनी मानले. या सभेला कोटगुल क्षेत्रातील बौद्ध उपासक- उपसिका बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.