सावली :- एका 16 वर्षीय अल्पवयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खेडी येथे घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी येथे गेल्या तीन महिन्यापासून किरायाने राहत असलेली पुनम राजकुमार शर्मा (16) रा. बाबूपेठ या अल्पवयीन युवतीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
25 डिसेंबरला सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कृपाल दुधे यांनी सावली पोलिसांना दिली. त्यानंतर सावली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले.
सदर प्रकरण नेमके काय आहे याची चौकशी करीता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे, पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे व तपास सुरु असून तरूणीच्या आत्महत्येमागील कारण वृत्तलिहीपर्यंत कळू शकले नाही.