तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri News,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur Today,

Bramhapuri,Bramhapuri News,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur Today,

चंद्रपूर (ब्रम्हपुरी) : 
शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये बुधवारी दुपारी ३:०० वाजता घडली. सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून, शेतावर जाऊन धान कसे कापायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहितीनुसार, हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (६०) ही महिला बुधवारी सकाळी १०:०० वाजता धान कापायला गेली. दुपारी ३:०० च्या सुमारास शेतामध्ये असलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. डाेक्याचा भाग छिन्नविछिन्न करून या महिलेला शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये नेले. या महिलेच्या साेबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने वाघाने महिलेचा मृतदेह तिथेच ठेवून वाघ पळून गेला. 

सदर घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी. शेन्डे, वनक्षेत्र सहायक ए.पी. करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासह दाखल झाले. तसेच मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळी गाेऱ्हयाला केले जखमी -
बाेडधा येथील प्रल्हाद जयदेव हुलके हा युवक बैल शेतात चारण्यासाठी जात असताना वाघाने बाेडधा शेतशिवारातील वनविभागाच्या राेपवनासमाेरच एका गाेऱ्हयावर हल्ला करून जखमी केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.