सिंदेवाही (Sindevahi) : प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे, अशी प्रेमाची महती सांगताना म्हटले जाते. पण एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन जीवांना एकत्र राहण्यासाठी अनेकदा जातीच्या रोषाला सामोरे जावे लागते. धर्माच्या भिंती प्रेम करणाऱ्यांचे बळी घेतात. मात्र या जातीच्या बंधनाला धुळकावून नुकतेच वासेरा येथे दोन प्रेमवीर परस्परांमध्ये विवाहबद्ध झाले.
लखमापूर बोरी तालुका चामोर्शि जिल्हा गडचिरोली येथील रहिवाशी जीवनदास देवराव बावणे आणि पुष्पा परशुराम वासेकर यांचे मागील चार वर्षापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे दोघेही परस्परांमध्ये विवाहबद्ध होण्याच्या शपथा घेतल्या होत्या. मात्र त्यात जात आडवी आल्याने पुष्पा कडील कुटुंबीयांनी यांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे दोघांच्याही आनंदावर विरजण पडले. मात्र त्या दोघांचेही प्रेम त्यांना एकमेकांपासून दूर करण्यास धजावत नसल्याने जीवनदास आणि पुष्पा या दोघांनीही घरून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि ठरविल्याप्रमाणे एका मित्राच्या साहाय्याने सिंदेवाही गाठली. आणि वासेरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांचेकडे लग्न लावून देण्यासाठी दोघांच्या स्वाक्षरीने अर्ज सादर केला. त्यामुळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार यांनी पुढाकार घेऊन निमंत्रक देवेंद्र तलांडे यांना याबाबत माहिती दिली. आणि बघता बघता समितीमधील अनेक सदस्य ग्राम पंचायत कार्यालय येथे गोळा झाले. महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचे प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून हभप दिनकर बोरकर महाराज यांचे हस्ते मंगलाष्टके सादर करून जीवनदास आणि पुष्पा या दोघांचाही विवाह लावून देण्यात आला.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नंदनवार, सरपंच महेश बोरकर, उपसरपंच मंदा मुनघाटे, सदस्य नागेश बंडीवार, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, तंटामुक्त समितीचे सदस्य संजय कापकर, महेंद्र कोवले, गिरीश धात्रक, रवी बोरकर यांचेसह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. समि