गडचिरोली जिल्ह्यात नक्षल पुन्हा सक्रिय; तरुणाची केली गोळ्या घालुन हत्या, महिन्यात तीसरी घटना | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Naxal,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Today,

 

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Naxal,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Today,

गडचिरोली :- जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एका तरुणाची शेतशीवारात गोळ्या झाडून हत्या केली आहे . गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून महिनाभरात नक्षलवाद्यांनी तीन इसमांची हत्या केली आहे. त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम उप- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गम भाग असलेल्या कापेवंचा येथील रामजी आत्राम वय २७ या युवकाची शुक्रवारी नक्षलवाद्यांनी शेतात जाऊन गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपल्या शेतात काम करीत असताना संध्याकाळच्या सुमारास आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी शेतात जाऊन गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यामुळे महिनाभरात नक्षलवाद्यांनी केलेली ही तिसरी हत्या असून या घटनांमुळे गडचिरोलीच्या दक्षिण भागात नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढून रक्तपात सरू केला आहे.

याआधी दिवाळीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे,२३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यामुळे दक्षिण गडचिरोली भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात येऊन नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला आहे असे डिवचल्यामुळेच ते आता सक्रिय होऊन जिल्ह्यात रक्तपात घडवून आणत आहेत असेच म्हणावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.