संविधान सन्मान रॅली व संविधान उद्देशिकेचे वाचन
कोरची:- कोरची शहरात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय संविधान व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रीय गीत व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने व संविधानाच्या सन्मानापर कोरची शहरात बुद्धिस्ट युवा संघटना कोरचीच्या वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. ह्या सन्मान रॅली मध्ये बौद्ध समाज कोरची येथील महिला तसेच पुरुष व छोटी मुले सुद्धा बहुसंख्येने सहभागी झाले. रॅली बौद्ध झेंड्याजवळून निघाली आणि फुले चौकातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोठ्या जयघोशाने लुंबीनी विहार कोरची येथे समापन करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.