मारोतराव सांभाशिव कन्नमवार यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,

आज दिनांक 24 नोव्हे.2023  रोजी कर्मवीर कन्नमवार  विद्यालय सुरबोडी येथे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री स्वर्गीय मा.सा. कन्नमवार जी म्हणजेच मारोतराव सांभाशिव कन्नमवार यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री पीलारे सर यांनी  स्व.मा.सा कन्नमवारजी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पन करून अभिवादन केले, तर आधुनिक किसान शिक्षण संस्थेच्या सदस्य तथा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कुमारी ज्योती मॅडम यांनी कन्नमवारजी यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण केली, त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा स्व.मा.सा .कन्नमवारजी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले .

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पीलारे सर यांनी आपल्या विद्यालयाला कर्मवीर कन्नमवार हे नाव आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे मुख्य संस्थापक स्वर्गीय दलित मित्र श्रीरामजी धोटे साहेब यांनी दिले आहे,आणि  स्वर्गीय धोटे साहेब हे स्वर्गीय कन्नमवारजी यांचे अतिशय निकटवर्तीय आणि अतिशय विश्वासातील होते. हे विद्यार्थ्यांना आवर्जून पटवून सांगितले.स्वर्गीय कन्नमवारजी हे अतिशय गरीब परिस्थितीतून शिकून वर्तमानपत्र वाटून आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कसे पोहोचले याचे प्रत्यक्ष कथन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पिलारे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण गरीब आहोत,  किंवा आपली परिस्थिती हलाखीची आहे, आपण मोठे होऊ शकत नाही, आपण मोठा पद भूषवू शकत नाही,अशा प्रकारचा कुठलाही नकारात्मक भाव मनात न बाळगता जिद्द आणि चिकाटीने आपण सुद्धा परिस्थितीवर मात करून मा.सा.कन्नमवारजी प्रमाणे मोठ्यातील मोठा यश जीवनात मिळू शकतो याकरिता आपल्याला सतत प्रयत्नशील राहून सकारात्मकता बाळगणे नितांत गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला  विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री माकडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.ढोरे सर यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.