⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli: नक्षलवाद्यांनी केली तीन व्यक्तींची हत्या | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Naxal,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

Gadchiroli News,Gadchiroli Naxal,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Batmya,

गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून तीन व्यक्तींची माओवाद्यांनी हत्या (murder) केल्याची खळबळजनक घटना २ नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये उघडकीस आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.Narendra Modi) यांच्या प्रचार दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात हे थरारक हत्याकांड घडले.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तिघांची हत्या करून माओवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांना आव्हान दिले आहे. कुल्ले कतलामी (३५), मनोज कोवाची (२२) व डुग्गे कोवाची (२७), सर्व रा.मोरखंडी जि.कांकेर अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील छोटेबेठिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना २ नोव्हेंबरला उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांना माओवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात हे तिघे महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे. गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानच्या सी – ६० पथकासाठी हे तिघे खबरी म्हणून काम करत होते, असा माओवाद्यांना संशय होता, त्यातून त्यांना संपविण्यात आले.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, २ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कांकेर जिल्ह्यात नियोजित प्रचार दौरा होता. त्याआधीच माओवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. छत्तीसगड पोलिसांनी या हत्याकांडाबाबत तपास सुरू केला असून, पंतप्रधानांनी कडक सुरक्षा यंत्रणेत नियोजित प्रचार दौरा केला. यावेळी फेरी काढून त्यांनी सभेला संबोधित देखील केले.

महाराष्ट्र पोलिसांच्या रेकॉर्डवर खबरीच नाहीत :
दरम्यान, पोलिस सूत्रांनुसार महाराष्ट्र पोलिसांच्या रेकाॅर्डवर कुठल्याही खबरींची नोंद नाही. नक्षल्यांबाबत गोपनीय माहिती पुरविणारे कुठलेही खबरी सध्या सक्रिय नाहीत. तथापि, या घटनेत मृत्यू पावलेले तीनही व्यक्ती हे छत्तीसगडमधील असून, ही घटनाही छत्तीसगडमध्येच घडलेली आहे. त्यामुळे मृत व्यक्ती महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याचा संशयातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.