Education: ब्रेकिंग ! दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | Batmi Express

Maharashtra Board Exam Time Table,HSC Exam,Education,Education News,SSC Exam,SSC 2024 Exam,HSC 2024 Exam,HSC 2024 Exam News,SSC 2024 Exam News,

Maharashtra Board Exam Time Table,HSC Exam,Education,Education News,SSC Exam,SSC 2024 Exam,HSC 2024 Exam,HSC 2024 Exam News,SSC 2024 Exam News,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.

पहा कसे संपूर्ण वेळापत्रक: इयत्ता 10 वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान होणार. तर इयत्ता 12 वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार, अशी माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. अधिक महितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.