Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात हिरापूर येथील महिला जागीच ठार | Batmi Express

Be
0
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack
Be gallery  (बातमी दर्शिवीत _)

गडचिरोली: प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाघाच्या हल्ल्यात हिरापूर येथील इंदिरा रुमाजी खेडेकर ही महिला ठार झाल्याची घटना आज घडली.

मिळालेल्या माहितीनुसार इंदिरा रुमाजी खेडेकर वय 55 मु. हिरापूर पोस्ट. गुरवडा ता. जी. गडचिरोली ही महिला दुपारी आपल्या शेतात गेली होती त्यानंतर शेतालगत असलेल्या झुडपी जंगलामध्ये झाडण्या कापायला गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाई वर अचानक हल्ला केला या हल्ल्यात ती जागीच ठार झाली.
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,
इंदिरा रुमाजी खेडेकर - बातमीचा फोटो 

सायंकाळ होऊनही ती महीला शेतातून घरी न आल्यामुळे ही माहिती गावकऱ्यांना मिळताच या महिलेचा शोध दोन-तीन वाजता पासून सुरू होता. परंतु सायंकाळी अंदाजे चारच्या सुमारास त्या महिलेच्या साडीवरून आणि रक्ताच्या ठशावरून जवळच त्या महिलेचा प्रेत आढळून आला.त्यावरून त्या महिलेला वाघाने ठार केले हे लक्षात आले .


त्यामुळे या परिसरात एकच खडबड उडालेली असून या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे .तसेच शेतकऱ्यांनी शेतात जात असताना काळजीपूर्वक कामे करावे , वाघ दिसल्यास वन विभागाला कळवावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->