काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्याची भेट
गडचिरोली: कोनसरी प्रकल्प लवकरात लवकर सुरु करा व स्थानिकांना प्राधान्य देऊन रोजगार द्या, जो पर्यंत कोनसरी येथील प्रकल्प सुरु होत नाही तो पर्यंत सुरजागड येथील कच्चा माल जिल्ह्यातच डम्पिंग करून ठेवण्यात यावा. शिवाय जिल्ह्यात पर्यावरणपूरक नवीन उद्योग निर्मिती करण्यात यावे या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या शिस्टमंडळाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, महादेव भोयर, दिवाकर निसार, बाबूराव गडसूलवार, लालाजी सातपुते, सुदर्शन उंदीरवाडे, ढिवरू मेश्राम देवेंद्र भोयर, नितेश राठोड, मोहित अत्रे, श्रीनिवास ताटपल्लीवार, दिगेशवर धाईत, श्रीकांत भजभुजे, परशुराम गेडाम, बबिता उसेंडी सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.