पवनी: क्रिकेटच्या खेळात ब्याटने मारुन घेतला निष्पाप तरुणाचा जीव | Batmi Express

Be
0
Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Crime,Bhandara News,Bhandara Live,अड्याळ,Adyal,Pauni,

अड्याळ (पवनी )
:- मैच खेळण्याचा नाद निवृत्तीच्या जीवावर बेतला आहे. करण ने क्रिकेट वरून उद्भवलेल्या वादात निवृत्तीला ब्याटने मारहाण केल्याने निवृत्तीचा जीव गेला आहे. वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी करण च्या विरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहिती नुसार अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली टोली पेठे आज दिनांक (5 नोव्हेंबर) ला १.३० वाजेच्या सुमारास दोन खेळाडू मध्ये आपसात वाद होऊन तो वाद इतका विकोपाला गेला की आरोपी नामे करण रामकृष्ण बिलवणे वय 21 राहणार चिखली याच्या मारहाणीत निवृत्तीचा जीव गेला आहे.

निवृत्तीनाथ गोपीचंद कावळे (24) आणि करण रामकृष्ण बिलवणे (21) दोघेही रा. चिखली टोली, ता. पवनी हे मित्रासोबत गावातील मैदानात क्रिकेट खेळत होते. त्यांच्यात एक मॅच
खेळण्यावरून वाद झाला.

या कारणावरून आरोपीने मृतकाच्या हातातील क्रिकेट खेळण्याचे बॅटने मृतकाच्या पायावर मारले तेव्हा मृत खाली वाकला. त्याच वेळी आरोपीने पुन्हा बॅट मृतकाला मारण्यास उगारली असता मृतकाच्या मानेवर डावे बाजूला लागली. त्यामुळे मृतक जागेवर बेशुद्ध पडला त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे भरती केले असता उपचारा दरम्यान मृत्यू पावला. फिर्यादी प्रसाद रामकृष्ण धरम सहारे वय 23 राहणार चिखली यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट व ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.. कायमी अपराध क्रम 242 / २०२३ कलम 302 भादवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पोउपनी हेमराज सोरते / यांनी दाखल केला असून तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->