कोरचीचे केंद्रप्रमुख हिराजी रामटेके डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित | Batmi Express

Korchi,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,

Korchi,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,

कोरची:
श्री गुरुदेव सेवाश्रम आग्याराम देवी चौक नागपूर येथे दिनांक 5 नोव्हेंबर 2023 ला आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये हिराजी एम. रामटेके (केंद्रप्रमुख) केंद्र कोरची पं.स. कोरची यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार प्रदान करून  गौरविण्यात आले. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वे करण्यात आले होते व त्यामधून आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची नावे या पुरस्कारासाठी प्रस्तावित करण्यात आली होती.

          या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले, अध्यक्ष म्हणून गिरीश पांडव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत वंजारी नागपूर पदवीधर मतदारसंघ, अमरावती विधान परिषद शिक्षण मतदारसंघ एडवोकेट किरण सरनाईक, अभिनेता देवेंद्र दोडके, अ. भा. काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनिल नगरारे, मदत फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष नरेश खडसे, सचिव दिनेश वाघमारे तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या पुरस्कारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यातून केंद्रप्रमुख हीराजी रामटेके यांची निवड झाली व त्यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आला ही अतिशय गौरवाची बाब असून मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांना जिल्हाभरातून व कोरची तालुक्यातील सर्व शिक्षकवृंदाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.