मुंबई (Mumbai) : गोरेगावात ६२ वर्षीय आजी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आले. या कारवाईत एका १६ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. अरुणा संतोष सिंग (६२), रेश्मा फरीद शेख (३०) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. तर रिझवान नसीर सय्यद (३१) अटक केली आहे.
पोलिस हवालदार दिग्विजय राजाराम पानसरे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अरुणा या वेश्या दलाल रेश्मा आणि रिझवान आणि रुबी नावाच्या मदतीने गोरेगाव पश्चिमेच्या सिद्धार्थनगर येथील इमारत क्रमांक १६ च्या तळमजल्यावरील रूम क्रमांक २४२ या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली.
अधिक तपास सुरू –
– एका शाळेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हे सेक्स रॅकेट सुरू होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला.
– सेक्स रॅकेटसाठी अल्पवयीन मुलीची विक्री केली. तिला जबरदस्तीने अन्य महिलांसोबत वेश्या व्यवसायात ढकलले. ते पैसे अरुणा या स्वतः स्वीकारत होती.
– पथकाने याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत मुलीची सुटका केली आहे. या कारवाईत रिझवानला अटक केली असून तो पुण्यात राहण्यास आहे.
– गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे हे रॅकेट सुरू होते. यामध्ये आणखीन कुठल्या अन्य मुलीची विक्री केली आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.