गडचिरोली: खड्डा चुकविल अन... तरुणाचे जीव गमावल….! | Batmi Express

Be
0

kurkheda,kurkheda live,Kurkheda News,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

गडचिरोली :- 
जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील कढोली मार्गे जाणाऱ्या घाटी गावानजीक मुख्य डांबरीकरण रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे.खड्डा चुकविण्याच्या नादात आरमोरी तालुक्याच्या कोरेगाव येथील रहिवासी असलेल्या नेताजी बालाजी गेडाम (वय ३७ वर्षे )यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने मंगळवारी दिनांक-१७ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्रौ ८ वाजेच्या सुमारास त्यांचा अपघात झाला व ते रस्त्यावर पडले असता;त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली.त्यांना वेळीच कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून खड्डा चुकवितांना तरुणाचे जीव गमावलेल्या कुटुंबीयांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा…! अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुख्यत्वे म्हणजे,आपण नेहमीच बघत असतो की,एखादे वेळेस वाघ,वाघीण वा इतर हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला चढविला तर आपण मोर्चे वा इतर आंदोलने करून नुकसानभरपाई मागत असतो; मात्र एखादेवेळी मुख्य रस्त्यांवरील वा इतर ठिकाणांतील खड्ड्यांमुळे वा गतीरोधकांमुळे एखाद्या इसमाचा नाहक विनाकारण बळी गेल्यास त्यासाठी आपण चुप्पी साधून नशिबास दोष देऊन स्वतःला नेहमीच कोसत असतो.रेल्वे अपघातात एखादा प्रवासी जखमी वा मृत्यू पावल्यास रेल्वे प्रशासनास सुध्दा धारेवर धरून कोर्टातील पायऱ्या चढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असतोच.अशाच प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आपलीच पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असणाऱ्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे.मुख्य डांबरीकरण मार्गावरील खड्डे न बुजविनाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे काम असो वा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम असो; नाहीतर रस्त्याचे काम पूर्णत्वास आणणाऱ्या कंत्राटदाराचे काम असो; अशांवर कर्तव्यात कसूर वा कामात निष्काळजीपणा केल्या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; अन्यथा चालढकल कामे करून परत एखाद्या सर्वसामान्य नागरिकांचा नाहक बळी पडल्याशिवाय राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->