चंद्रपूर (चामोर्शी ) :- विवाहानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या युवकाला विवाह झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच अपघातात जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना घडली.
चंद्रपूर येथून महाकाली मातेचे दर्शन घेऊन आपल्या पत्नीसह दुचाकीचे परत येत असताना सावली जवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 19 ऑक्टोंबर गुरुवारी पाऊने दहा वाजताच्या सुमारास घडली
प्रमोद देवराव जयपूरकर रा. आष्टी ता. चामोर्शी जि.गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर प्रणाली प्रमोद जयपूरकर वय 23 वर्ष असे गंभीर जखमी चे नाव आहे.
आष्टी येथील प्रमोद जयपूरकर हा गडचिरोली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात कंत्राटी आर्किटेक्टर म्हणून कार्यरत होता. तो आपल्या पत्नीसह चंद्रपूर येथे महाकाली मंदिरात आयोजीत कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेला होता तिथून तो दुचाकी क्रमांक MH 33 U 3608 ने परत गडचिरोली कडे येत असताना सावलीनजीक त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली यात प्रमोद जयपुरकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी प्रणाली हीचा पायाला जबर मार लागला. तीला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.
प्रमोद याचा विवाह तेलंगणातील प्रणाली हिच्याशी मार्च महिन्यातच पार पडला विवाहाला केवळ सात महिने पार पडले असताना दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असताना प्रमोद च्या अशा अकाली जाण्याने जयपूरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो मनमिळावू स्वभावाचा म्हणून परिचित होता.या घटनेची आष्टी येथे माहिती कळताच एकच शोककळा पसरली असून त्याच्या मागे पत्नी, आई, वडील, मोठा भाऊ, बहीण असा आप्तपरीवार आहे.