1000 Rupee Note Comeback: एक हजाराची नोट पुन्हा येणार? आरबीआई ने दिली महत्त्वाची माहिती | Batmi Express

1000 Rupee Note Comeback,RBI News,RBI Latest News,India,India News,Mumbai,live mumbai news,Mumbai News,Mumbai Live,Mumbai Today,

1000 Rupee Note Comeback,RBI News,RBI Latest News,India,India News,Mumbai,live mumbai news,Mumbai News,Mumbai Live,Mumbai Today,

मुंबई :
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्यानंतर चलनात २ हजार रुपयाची नोट आणली. आता यावर्षी ३० सप्टेंबर रोजी २ हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्यात आली आहे.

नागरिकांना या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा एक हजार रुपयांची नोट परत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत RBI ने महत्त्वाची माहिती दिली आहे.

२०१६ नंतर तब्बल ७ वर्षांनी रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा तीच घोषणा केली आणि यावेळी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून पूर्णपने बंद केली आहे. आता पुन्हा एकदा १००० रुपयांची नोट परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) २ हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वेळ दिला होता. अंतिम मुदतीपर्यंत ८७ टक्के चलन बँकांमध्ये परत गेले असले तरी अजूनही १० हजार कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा बाजारात आहेत. आता त्यांची वैधता संपली आहे. ज्यांच्याकडे २ हजार रुपयांच्या नोट आहेत. त्यांना व्यवहारात त्यांचा वापर करता येणार नाही.

२ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर लवकरच १ हजार रुपयांचे चलन सिस्टीममध्ये येईल, असा दावाही अनेकांनी केला. मात्र, यावर रिझर्व्ह बँकेने १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत भविष्यातही कोणतीही योजनाही नाही असेही यावेळी सांगितले.

चलनात ५०० रुपयांच्या नोटा आहेत. अर्थव्यवस्थेतील रोख रकमेची गरज भागवण्यासाठी त्या पुरेशा असल्याचंही आरबीआयने सांगितले. डिजिटल व्यवहारही झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे रोखीची कमी गरज भासणार आहे. सध्या प्रणालीमध्ये आवश्यक तेवढा रोख प्रवाह आहे. लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये आणि चलनाबाबत जागरूक राहावे, असे आवाहनही रिझर्व्ह बँकेने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.