Mumbai Sex Racket: मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ९ तरुणींची सुटका | Batmi Express

Sex Racket,crime mumbai,Mumbai News,Mumbai,Mumbai Sex Racket,Crime in Mumbai,

Sex Racket,crime mumbai,Mumbai News,Mumbai,Mumbai Sex Racket,Crime in Mumbai,

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातून पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. घटनास्थळावरून ९ तरुणींची सुटका केली आहे. तसेच स्पा मॅनेजरला अटक केली आहे. तर स्पाचा मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी केली जात आहे. या प्रकरणामध्ये अनेक बड्या धेंडांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.पोलिसांनी सांगितले की, स्पा सेंटरवर टाकलेल्या धाडीमधून मणिपूरमधील ४, मिझोरममधील दोन आणि मेघालय, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. 

स्पा सेंटरचा मॅनेजर चंद्रकांत उर्फ बंटी याला अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं आहे. तर स्पाचा मालक अतुल धिवर हा फरार आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पा सेंटरच्या आडून सेक्स रॅकेट चालत होते, असे पोलिसांनी सांगितले.

क्राईम ब्रँचच्या समाजसेवा शाखेने अंधेरी पश्चिममधील म्हाडा परिसरातील मसाज स्पाच्या आडून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रिवाइव्हल वेलनेस या स्पा सेंटरवर धाड घातली. यामध्ये ९ मुलींची सुटका करण्यात आली. तपासामध्ये मुख्य आरोपी अतुल धिवर याच्या अनुपस्थितीत त्याचा भाऊ हर्षद धिवर हा स्पाचं कामकाज सांभाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपींविरोधात कलम ३७०(३), ३४ सह कलम ३, ४ आणि ५ अनैतिक व्यापारासह गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.