नागभीड: घोडाझरी नहरात पडून महिलेचा मृत्यू | Batmi Express

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Drowned,

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Drowned,

नागभीड:
- नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) पोलिस ठाणे हद्दीतील सोनापूर येथील रंजना कुर्झेकर या 42 वर्षीय महिलेचा घोडाझरी नहरात पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली.

मृतक महिला नेहमीप्रमाणे बुधवारी शेळ्या चराईसाठी घोडाझरी नहर परिसरात गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेतला. पण, ती कुठेच मिळून आली नाही. दरम्यान, उपसरपंच महेश फटिंग व अन्य सहकार्याने घोडाझरी परिसर गाठून शोध घेतला. नहराच्या किनार्‍यावर त्या महिलेच चप्पल व काडी आढळून आली.

लागलीच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शोधमोहिम राबवली. घटनास्थळापासून बर्‍याच अंतरावर त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. मृतक महिलेच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.