गडचिरोली:
◆ओबीसीची जातनिहाय जनगणना करा.
◆मराठा समाज बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये
या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांना घेऊन कुणबी - ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येते महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात माजी मंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले,आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार परीनय फुके, माजी आम. आनंदराव गेडाम, ऍड. गोविंदराव भेंडारकर, सतीश विधाते, विश्व्जीत कोवासे, प्रशांत वाघरे, अतुल गण्यारपवार, मिलिंद खोब्रागडे, विजय गावंडे, प्रमोद भगत, वसंत राऊत, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले सह हजारोच्या संख्येने बहुजन -ओबीसी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते.