गडचिरोली : भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांची लोकप्रियता वाढत चालेली आहे. राहुलजी सतत गोरगरीब जनता, महिला, युवक, शेतकरी, आणि देशातील सर्व सामान्य नागरिकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या प्रश्नांना घेऊन सरकारला जाब विचारत आहे. त्यामुळे केंद्रातील हुकूमशाही भाजप सरकार घाबरले असून राहुलजी गांधी यांना बदनाम करण्याकरिता व मूळ विकासाच्या मुद्यावरून सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष विचलित करण्याकरीता भाजपा राहुलजी गांधी यांना सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणात, तर कधी खोटे आरोप करून तर कधी नाना प्रकारच्या उपाध्या लावून बदनामी करीत आहे. याचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटीच्या जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक इंदिरा गांधी चौकात भाजप विरोधात घोषणाबाजी देत जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परीवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, अनिल कोठारे, लालाजी सातपुते, मनोहर नवघडे, प्रभाकर कुबडे, निकेश कामीडवार, पुरुषोत्तम सिडाम, सुभाष धाईत, कमलेश खोब्रागडे, बंदोपंत चिटमलवार, प्रफुल आंबोरकर, माजिद सय्यद, सदाशिव कोडापे, उत्तम ठाकरे, मिलिंद बारसागडे, बाबुराव गडसूलवार, योगेश्श लांजेवार, सुधीर बांबोळे, मनोज उंदीरवाडे, नितेश राठोड, जावेद खान, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर, रिता गोवर्धन सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.