ब्रम्हपुरी: वडसा पोलिस स्टेशनच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पळसगावात वडसा मार्गे ब्रम्हपुरी वरून मोठ्या प्रमाणात दारूची आयात केली जाते. पुरवठादाराकडून दारूची आयात करून येथील विक्रेत्यांना पुरवली जात आहे. त्यामुळे नवीन बेरोजगार अवैध दारू व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे गावामध्ये खुलेआम दारू मिळत असल्याने महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बेरोजगार तरुणांच्या कुटुंबातील चुली कधी पेटतात तर कधी पेटत नाहीत. आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत होत असून घरातील
कुटुंबाच्या दारू व्यसनामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम पडत आहे. येथील दारू विक्रेते टू व्हीलरवर डिक्कीत दारू लपवून पिणाऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचती करून देतात. दारू सुजाण नागरिकांकडून दारूबंदी विषयी चर्चा निघाल्यास अरेरावीची भाषा करून अपमानही करायला दारू विक्रेते मागे पुढे बघत नाही.
अतिशय बेकार अवस्था पळसगाव येथील झाली आहे. पोलिसांच्या डोळ्यापुढे दारू विक्री होत असताना अवैध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होऊ नये होत नाहीत. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.