भंडारा: बेपत्ता युवकाचे प्रेत वैनगंगा नदीच्या पात्रात आढळले | Batmi Express

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara News,Drowned,

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara Live,Bhandara Marathi News,Bhandara News,Drowned,
खमारी बुटी :भंडारा तालुक्यातील गिरोला येथील युवक अतुलेश ताराचंद टेंभुर्णे (४४) हा दि. २३ सप्टेंबर रोजी नोकरीवर जातो म्हणून घरून निघून गेला. नोकरीवर न गेल्याचे समजल्यावर त्यांच्या वडीलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार कारधा पोलीस स्टेशन येथे दिली. अतुलेशचा शोध घेण्यात आला. अखेर दि. २८ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अतुलचे प्रेतच अर्जुनी (पुनर्वसन ) वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्यावर तरंगतांना दिसून आले. या संबंधित कारधा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला.

भंडारा तालुक्यातील गिरोला येथील आशिर्वाद नगर रहिवासी अतुलेश ताराचंद टेंभुर्णे या सदर युवकाला नागपूर वाडी येथे वाहक पदावर नोकरी लागल्याने तो नोकरीवर दि. ५ सप्टेंबरला रुजू झाला. शिकाऊ उमेदवार म्हणून १५ दिवसांची ट्रेनींग सुरु असतांना त्याने

ट्रेनिंगमध्ये फक्त दोनच दिवस काम केले. पुन्हा घरी परत आला व दि. २३ सप्टेंबर ला नोकरीवर जातो म्हणून सकाळी ९ वाजता आपली बॅग घेऊन निघून गेला. मृतक हा आपल्या नोकरीवर न गेल्याने तो राहत असलेल्या किरायाच्या घरी नागपूर वाडी येथे घर मालकाशी फोनवर विचारपूस करण्यात आली. परंतू तो तिथेही दिसून न आल्याने या बाबत त्यांचे वडील ताराचंद टेंभुर्णे यांनी दि. २५ सप्टेंबर २०२३ ला बेपत्ता झाल्याची तक्रार कारधा पोलीस स्टेशन येथे दाखल केली. मात्र अतुलेश टेंभुर्णे याचे प्रेतच दि. २८ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अर्जुनी (पुनर्वसन) वैनगंगा नदी पात्रात तरंगतांना दिसून आले. सदर प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार पुरुषोत्तम थेर हे तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.