⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

धक्कादायक! रात्रीचं जेवण केलं.... आधी पत्नी, नंतर पतीचा झाला मृत्यू | Batmi Express

Aheri,Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

Aheri,Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,

अहेरी:- अहेरी येथून 7 किमी अंतरावर असलेल्या महागाव बु. येथील टिंबर मार्ट व्यवसायिक शंकर तिरुजी कुंभारे (52) आणि त्यांच्या पत्नी विजया शंकर कुंभारे (45) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शंकर कुंभारे यांचा महागाव येथे टिंबर मार्टचा व्यवसाय आहे. ते आपल्या पत्नी व सुनेसह महागाव येथील घरात राहत होते. शुक्रवारी (दि.22) रात्री जेवण केल्यावर विजया कुंभारे यांची प्रकृती बिघडल्याने पती शंकर कुंभारे यांनी आलापल्ली येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना चंद्रपूर महागाव येथील येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

शंकर कुंभारे यांनाही बरे वाटत नसल्याने त्यांनाही चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. दोघांच्याही वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र, एकाही चाचणीत समस्या दिसली नाही. प्रकृती चिंताजनक झाल्याने दोघांनाही नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. येथेही दोघांच्या चाचण्यांचा रिपोर्ट नॉर्मल निघाला. मात्र, उपचारादरम्यान अवघ्या चार दिवसांत मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल स्पष्ट:

नागपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह महागाव येथे आणण्यात येणार आहे. जेवणानंतर दोघांची प्रकृती विघडल्याने जेवणातून विषबाधा तर झाली नाही ना? किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाला का, याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरनंतरच स्पष्ट होईल. मात्र, पत्नी-पत्नीच्या मृत्यूबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.