कंत्राटीकरणाच्या विरोधात 18 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे आंदोलन | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Live News,Gadchiroli Today,

गडचिरोली
:  भाजप सरकार सत्तेत आल्यापासून खाजगीकरण  आणि कंत्राटीकरणाचा सपाटा सुरु केले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या अनेक युवकांचा भविष्य धोक्यात आला आहे. भाजप सरकार उप्रदर्वी असून समाजातील प्रत्येक घटकाला दुखवण्याचा काम त्यांनी केला आहे.  

खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारणे जि. प. च्या शाळा बंद करणे, नोकर भरतीत कंत्राटी पद्धत आणणे असे कृत्य हे सरकार करीत असून सर्वसामान्य गोरगरीब आणि बहुजनाच्या पोरांना शिक्षणापासून व मुख्य प्रवाहात आणन्यापासून दूर ठेवण्याचा कदाचित भाजप सरकारचा प्रयत्न असून त्याच्या निषेधार्थ, कंत्राटी भरती बंद करा या प्रमुख मागणी सह जिल्ह्यात सुरु असलेल्या जंगली हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा व शेतीला मुबलक प्रमाणात वीज पुरवठा करण्यात यावे या सारख्या अनेक मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  18 ऑक्टोबर 2023 रोजी, दुपारी 12 वाजता, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येते धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी काँग्रेस नेते, पदाधिकारी, सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कंत्राटीकरणाच्या विरोधात असणाऱ्या सर्व तरुन, युवक महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->