आरमोरी/वैरागड: वाघाने शेतकऱ्याच्या अंगावर घेतली उडी, झाडाची फांदी हाती अन... | Batmi Express

Armori,Armori Live,Armori News,Armori Tiger Attack,Vairagad,Gadchiroli,Gadchiroli News,
Armori,Armori Live,Armori News,Armori Tiger Attack,Vairagad,Gadchiroli,Gadchiroli News,

आरमोरी/वैरागड: अचानक वाघाने त्याच्या अंगावर उडी घेतली. मात्र शेतकऱ्याने झाडाची फांदी हाती घेऊन आपला जिव वाचविल्याची थरारक घटना १७ ऑक्टोबर रोजी वैरागड तालुक्याच्या नजीकच्या सोनपूर येथे घडली. रमेश डोंगरवार असे वाघाच्या हल्ल्यात बचावलेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

आज वैरागड येथून जवळच असलेल्या सोनपूर ( करपडा) येथील शेतकरी रमेश डोंगरवार हे चामोर्शी चक येथील आपल्या शेतात गेले व तिथून परत येत असताना सायकल वरून लघुशंकेसाठी उतरले असता अचानक वाघ अंगावर आल्याने शेतकऱ्याची भंबेरी उडाली .

त्यांनी जवळच असलेली एक झाडाची डहाळी उचलली असता वाघ थोडा बाजूला गेला. वाघ थोडा दूर गेल्याची संधी साधून त्या शेतकऱ्याने तिथून पळ काढला असता एका खड्ड्यात पडल्याने तो जखमी झाला. त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिकआरोग्य केंद्र वैरागडमध्ये भरती करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.