सावली:- सावली तालुक्यातील रैतवारी (जांब) येथील शेतकरी प्रकाश कोहळे वय ४५ वर्षे नामक इसमाचा विद्युत करंट लागून स्वतःच्याच शेतात मृत्यू झालेला आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ; शेतातील धान पिकाला काल रात्रीपासून मोटरचे पाणी सुरु होते. शेताला पाणी झाले की नाही म्हणून शेताची पाहणी करण्यासाठी ते आज सकाळी ८ वाजताच शेतात गेले. पण विद्युत खांबावरील मेन लाईनचा विद्युत तार तुटून पडलेला होता. हे काही त्यांच्या लक्षात आले नाही. आणि ते शेताला पाणी झाले की नाही म्हणून ते शेताची पाहणी करत नेहमीप्रमाणे बिनधास्त फिरत होते. शेतात फिरत असताना विद्युत खांबावरील तार तुटून पडलेला होता आणि तो तार प्रकाश कोहळे त्यांच्या पायाला लटकला आणि त्यातच त्यांचा होळपळून मृत्यू झाला.
विद्युत लाईन कुठे कट झाली. लाईनच्या कोणत्या खांबावर कोणती समस्या आहे. कोणत्या खांबावरुन विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. हे विद्युत महामंडळातील आँन ड्युटी कर्मचाऱ्यांना आँनलाईन दिसतं असतं तरीही विद्युत महामंडळाने त्या लाईनचा विद्युत प्रवाह खंडित का केला नाही. असा प्रश्न जनमानसाच्या मनात निर्माण झालेला आहे. विद्युत महामंडळाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळेच प्रकाश कोहळे यांचा मृत्यू झालेला आहे. विद्युत महामंडळाने (व्याहाड बुज सब डिवीजन) वेळीच विद्युत प्रवाह खंडित केला असता तर प्रकाश कोहळे यांचा नाहक बळी गेला नसता. यांच्या मृत्यूला विद्युत महामंडळच जबाबदार आहे. असा गावातील नागरिकांनाचा कल आहे.
प्रकाश कोहळे त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावसून असा परिवार आहे.