आरमोरी: रामाळा येथील महिलेला ठार करणारा वाघ अखेर जेरबंद | Batmi Express

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

Armori Tiger Attack,Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Armori Live,Tiger Attack,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,

गडचिरोली :- आरमोरी तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या रामाळा गावात दिनांक - १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास; काळागोटा येथील सात ते आठ महिला शेतात धान कापणी करीत असतांना दबा धरून बसलेली वाघीण टी- १३ हिने अचानकपणे शेतात काम करीत असलेल्या महिलांवर हल्ला चढविला होता; सदर वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात आरमोरी तालुक्याच्या काळागोटा येथील महिला ताराबाई एकनाथ ढोडरे अंदाजे वय ६० वर्षे नामक महिलेस वाघिणीने काही अंतरावर दूर फरफटत नेऊन नरडीचा घोट घेतला होता; सहकारी महिलांनी आरडा- ओरड करून महिलेची सुटका तर झाली; मात्र ताराबाई यांची प्राणज्योत मावळली होती. महिला मजुराला वाघिणीने ठार केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता.

लोकांचा रोष पाहून वन विभागाने टी- १३ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबाची एक व गडचिरोली येथून दोन रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. वाघिणीचे लोकेशन, पगमार्क शोधण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात २५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. तसेच घटनास्थळाजवळ शिकार सापळे (बेट) सुद्धा लावण्यात आले. शुक्रवारपासूनच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार रामाळा, चामोर्शी, ठाणेगाव, वैरागड, वनखी, चामोर्शी, रामपूर, आष्टा, करी परिसरातील नागरिकांना जंगलातजाण्यापासून रोखले जात होते. तसेच त्यांच्यात जागृती करण्यासाठी वन विभागतर्फे अभियान राबविण्यात आले.वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संदीप भारती,परीविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, आरमोरीचे कार्यतत्पर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम हे टी-१३ वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार आज सोमवार दिनांक- २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या रवी बिटातील मुलूर चक जंगल परिसरातील मधोमध टी- १३ वाघिणीला जेरबंद करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या वाघिणीच्या दहशतीतून सुटकेचा निःश्वास सोडला आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.