Tiger Attack: वाघाचा गुराख्यावर हल्ला अन... गुराखी ठार | Batmi Express

Be
0

Chimur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Tiger Attack,Chandrapur Today,Chandrapur Live,Tiger Attack,

चिमूर
:  तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथे दबा धरून बसलेल्या वाघाने एका गुराख्यावर हल्ला करून गुराखीला ठार केल्याची घटना आज घडली आहे. ही घटना पळसगाव वनपरिक्षेत्र मधील बेलारा येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

मधुकर जंगलू धाडसें (४९ ) रा.विहिरगाव,ता.चिमूर, जि. चंद्रपूर) अशी मृतकाचे नाव आहे. पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव बेलारा पळसगाव या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने परिसरात सफारी साठी पर्यटकांची पाहुले वळत असतात.
रविवारी सकाळी १० वाजेदरम्यान मधुकर धाडसे हे आपल्या सहा गुराखी सोबत गावातील गुरे चारण्याची त्यांची पाळी असल्याने ते आपल्या ६ सहकाऱ्यांसह मन्सराम जीवतोडे यांच्या पडीत असलेल्या शेतात जनावरे चारणाऱ्या साठी गेले होते.गुराखी गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.जनावरे हंबरु लागल्याने बाकी असलेल्या गुराखी यांनी धाडसे यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांचा शोध घेतला असता नाल्याजवळ काही अंतरावर त्याचे फरकडत नेल्याच्या पाहुल खुणा आडल्याने त्या खुणा बघत बघत जात त्याचे प्रेत नाल्याजवळ मिळाले आहे,
या हल्ल्यात मानेच्या खाली शरीराचा काही भाग हल्ला केल्याचे दिसून आले.वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या आधी अनेक वेळा वाघाच्या हल्लात गुराखी जखमी झाले आहे.
या घटनेमुळे विहिरगाव बेलारा या गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
वन परीक्षेत्र अधिकारी योगीता आत्राम यांनी वनविभागाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालया चिमूर येथे नेण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->