गोंदिया. अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांची सक्तमजुरी आणि 5 हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायालयाने 31 ऑगस्ट रोजी निकाल दिला आहे. फिर्यादी आणि आरोपी अजय उर्फ अज्जू धामेचा (वय 36, रा. संत कंवरराम वार्ड, तिरोडा) हे मित्र आहेत. मात्र, असे असतानाही अजय धामेचा याने त्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट आणि चारचाकी वाहनावर फिरवतो, असे सांगून बिरसी गावात नेले. आरोपीने बलात्काराच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श केला आणि शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून तिला जखमी केले.
7 जुलै 2016 रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान घडलेल्या या प्रकरणी 8 जुलै 2016 रोजी तिरोडा पोलिसात कलम 324, 323 पोटकलम 4, 6, 8 पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उजवणे हे करत होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गुरुवार, 31 ऑगस्ट रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपीला पाच वर्षे कारावास आणि 5 हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्याने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.