- शेवटी जमीन विकून पैसा केला जमा
- चंद्रपूर जिल्ह्यातिल घटना
चंद्रपूर :- ग्रामपंचायत च्या संगणक परीचालकाने ग्रामपंचायत चा निधी आपल्या वयक्तिक खात्यात वळता करून ऑनलाइन रमी मध्ये त्यातील लाखोंची रक्कम हरल्याचा महाप्रताप चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील एका ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक पटठ्याने घडविला आहे.
सदर प्रकरणाची गावांत कुणकुण लागताच संगणक परीचालकाने शेतजमीन विक्री करून 8 लक्ष 40 रुपयांचा भरणा करून प्रकरण शांत केल्याची माहिती आहे.
लाखोंची हेराफेरी झाली तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने प्रकरण आपसात मिटवून टाकत, तक्रार केली नसल्याची माहिती आहे.
ग्रामपंचायत मधील संगणक परीचालकाने 14 व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायत चा शासकीय निधी ग्रामसचिवांच्या डिजिटल स्वाक्षरी ने आपल्या स्वतःच्या खात्यात वळता करण्याची हेराफेरी करून स्वतःच्या मोबाईलवरून Online Rummy ऑनलाइन रमी व्यसनाच्या नादात त्यातील 8 लाख 40 रक्कम हरला.
ग्रामपंचायत मधील 14 व्या वित्त आयोगाच्या खात्याचे पासबुक मिळत नसल्याने ग्रामसचिवांनी नवीन पासबुक काढण्याची प्रक्रिया करित नवीन पासबुक काढले असता त्यात केवळ 5 हजारांची रक्कम शिल्लक होती.
8 लाखांच्यावर रक्कम असलेल्या खात्यात केवळ 5 हजार यामुळे खात्याची स्टेटमेंट वरून तपासणी केली रक्कम संगणक परीचालकाच्या वयक्तिक खात्यात वळती केल्याचे लक्षात आले त्यावरून हा घोळ पुढे आला,
या प्रकरणाची गावात कुजबुज सुरू झाली असता, ग्रामपंचायत मधील जबाबदार प्रशासनाने सदर प्रकरण आपसात गुंडाळत, प्रकरणाला पांघरूण घालीत कुठेही तक्रार केली नाही.
हेराफेरी व शासकीय निधीचा घोळ यामुळे पोलीस कारवाईच्या भीतीने संगणक परीचालकाने शेतजमीन विकून रक्कम ग्रामपंचायत च्या खात्यात जमा केली असल्याची माहिती आहे.
सरपंच यांच्येशी संपर्क साधला असता “ग्रामपंचायत च्या 14 व्या वित्त आयोगाच्या बँक खात्याचे पासबुक 2 ते 3 महिन्यापासून गहाळ झाल्याने हा प्रकार लवकर लक्षात आला नाही, खर्च केलेली रक्कम संगणक परीचालकाने जमा केली’” अशी माहिती दिली, सदर प्रकरण घडल्याचे व गहाळ करण्यात आलेली रक्कम जमा करण्यात आल्याची कबुलीही सरपंचाने दिली.
आता सदर प्रकरणाची तक्रार दाखल झाली नसली तरीही, वरीष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.