आरमोरी : वैरागड पासून जवळील असलेल्या सुकाळा येथील इसम वैरागड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेढेबोडी येथे पांदण रस्त्याने पायदल आला होता. नंतर तो गावाकडे परत जाताना मेढेबोडी येथील शेतात आज गुरुवारी सकाळी ११ सुमारात मृता अवस्थेत आढळून आला.
मृत व्यक्तीचे नाव अण्णा देवराव वटी (५५) आहे. रा. सुकाळा असे असून तो गुरुवारी सकाळी सुकाड्यावरून मेंढेबोडी येथे दारू पिण्यासाठी मेंढेबोडी सुकाळा दरम्यान असलेल्या पांदण रस्त्याने पायदल दारू पिण्यासाठी आला होता असे लोकांचे म्हणणे आहे.
त्याला नंतर त्याच रस्त्याने सुकाळा येथे आपल्या गावी परत जाताना रस्त्यादरम्यान असलेल्या देवानंद कोटांगले यांच्या शेतात अति दारू पिल्याने तो त्याच ठिकाणी पडला असावा व मृत्युमुखी पावला अशी चर्चा आहे.
याबाबत आरमोरी येथील पोलिसांना तक्रार नोंदणी असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत मृतक हा परराज्यात मजूरीसाठी गेला होता. दोन दिवसातून पूर्वी तो स्वगावी परतला त्याच्या पश्चात पत्नी व बरच मोठा परिवार आहे.