गोंदिया. येथील बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या महिलेला पकडण्यात देवरी पोलिसांना यश आले आहे. देवरी तहसीलमधील आमगाव येथील रूपलता टेंभुरकर या महिला २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता डव्वा येथील आपल्या घरी जाण्यासाठी स्थानिक बसस्थानकावरून बसमध्ये चढत असताना कोणीतरी गर्दीचा फायदा घेत तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. महिलेने तत्काळ देवरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी हवालदार ज्ञानीराम करंजेकर यांनी तपासाची चक्रे फिरवत महिला चोरट्याला ३० ऑगस्ट रोजी बसस्थानक देवरी येथून अटक केली. त्याच्याकडून तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. आरोपी महिलेने तिचे नाव वर्षा कांबळे असल्याचे सांगितले.