वडसा:- तालुक्यातील फरी येथील महानंदा दिनेश मोहुर्ले नामक महिलेस ११ सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असतांना ‘टी-14’ वाघिणीने हल्ला चढवून ठार केले होते.त्यानुसार गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच जमाव करून वाघ,वाघीण व जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा; अन्यथा वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी मज्जाव केला होता. त्यानुसार वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक(ACF) मनोज चव्हाण यांनी ‘रेस्कु टीम’ ला पाचारण करीत वाघिणीची शोध मोहीम राबविली असता आज 17 सप्टेंबर 2023 रोजी अखेर 6 दिवसांनी ‘टी-14’ वाघिणीला पकडण्यास वन विभागास यश आले आहे.
सदर वाघीण शिवराजपुर जवळील चिखली रिठ येथील कक्ष क्रमांक-866 येथून आज सकाळी 6.45 वाजेच्या दरम्यान जेरबंद करण्यात आली आहे.सध्याच्या घडीला कोंढाळा-उसेगाव,फरी व इतर जंगल परिसरात ‘टी -2’ वाघिणीचे पिल्ले व इतर वाघांचे वास्तव्य असल्याची माहिती आहे.त्यानुसार ‘टी -2’ वाघिणीचे पिल्ले मोठे झाल्यास जंगल परिसरात स्वतंत्र भ्रमंती करीत असतात. त्यातीलच एक दीड वर्षाची मादी म्हणजेच ‘टी-14’ वाघिणीने फरी येथील महिलेस शेतात काम करीत असतांना ठार केले होते. त्यानुसार गावकऱ्यांचा रोष पाहून वाघिणीला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा याठिकाणी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
wadsa: A woman named Mahananda Dinesh Mohurle of Phari in Desaiganj taluka was attacked and killed by a tigress 'T-14' while she was working in the field on 11 September 2023 around 9 am. should come Otherwise, the citizens had prevented the body of the woman killed in the tiger attack from being taken for post-mortem. Accordingly, Manoj Chavan, Assistant Conservator of Forests (ACF) of Vadsa Forest Department called the 'rescue team' and launched a search operation for the tigress today, 17th September 2023. Forest department has succeeded in catching 14' tigress.
The said tigress was captured from room no-866 at Chikhali Rith near Shivrajpur today between 6.45 am. At present, it is known that 'T-2' tigress cubs and other tigers are living in Kondhala-Usegaon, Fari and other forest areas. Accordingly, 'T-2' tigress cubs, when they grow up, roam independently in the forest area. One and a half year old female i.e. 'T-14' had killed a woman from Phari while working in the field. According to the sources, information has been received that seeing the anger of the villagers, the tigress will be imprisoned and taken to Gorewada in Nagpur.