वडसा: आराम घेतांना इसमाचा गावातील बैठकीवरच झाला मृत्यू | Batmi Express

Be
0

wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa Today,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News IN Marathi,

वडसा
:-  तालुक्यातील कोंढाळा येथील इसमाचा गावामध्ये ठेवण्यात आलेल्या बैठकीवरच आराम  घेतांना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी अंदाजे 11 वाजून 50 मिनटास उघडीस आली आहे. दरम्यान या घटनेन गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या प्राप्त ताज्या माहितीनुसार, मृतकाचे नाव खटू ऊर्फ प्रभाकर रामा बुराडे (वय अंदाजे ५२ ) रा. कोंढाळा येथील रहिवाशी आहे. गावातील नागरिकांनी अस सांगितलं की, काही काम करून घरी परत जात असतांना, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वार्ड क्रमांक ४ येथील राजू शिवणकर यांच्या घरासमोरील परिसरात ठेवण्यात आलेल्या बैठकीवर आराम करण्यासाठी बसले; 

आराम  घेत असतांना घरा नजिकचे काही नागरिक त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न करीत असतांना बुराडे यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने गावातील पोलीस पाटील किरणताई कुंभलवार यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. माहिती देताच पोलीस पाटील यांनी घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता, प्रभाकर बुराडे हे मृत असल्याचे दिसून आले.

सदर घटनेची माहिती वडसा/देसाईगंज पोलीस ठाण्यातील कोंढाळा बिट अंमलदार मदन मडावी तसेच जांभूळकर यांना देताच घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण घटनेची माहिती व शहानिशा करून ठाणेदार किरण रासकर यांना कळविण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->