वडसा (देसाईगंज):- तालुक्यातील डोंगरगांव-पळसगाव जंगल परिसरा नजिक आज १६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास जंगली हत्तीने एका वन कर्मचाऱ्यास ठार केले. नाव सुधाकर बाबुराव आत्राम (वय अंदाजे ४५ वर्षे ) नामक वन कर्मचाऱ्यास ठार केल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभाग तसेच परिसरात एकच बाब उडाली आहे.
जंगली हत्तीने ठार केलेले आत्राम हे वन विभागात वाहन चालक पदावर कार्यरत असून सुरुवातीला जंगली हत्तीने आत्राम यांना सोंडेने उचलून व नंतर पायाने तुडून मारल्याची माहिती समोर आली आहे.