बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. झडत्या वाचण्यापेक्षा त्याचं सादरीकरण मनोरंजक ठरतं. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते. पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात. हा लोककलेतील काव्यप्रकार. गावातील लोकच झडत्यांची निर्मिती करतात. झडत्या वाचण्यापेक्षा त्याचं सादरीकरण मनोरंजक ठरतं. विशिष्ट लयीत बैलांच्या साक्षीने झडत्या सादर होतात.
पोळ्याच्या झडत्या:
माह्या पायाला रूतला काटा,
झालो मी रिकामा,
नाही पिकलं यंदा,
तर जीव माह्या टांगनिला
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव आम्ही करतो पराटीची शेती,
परावटीवर पडली बोंड अळी,
नागोबुडा म्हणते बुडाली शेती,
प्रकाश पाटील म्हणते लाव मातीले छाती,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव वाटी रे वाटी, खोबऱ्याची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी
देव कवा धावंल गरीबासाठी
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा
वरच्या राणातून आणली माती
ते देल्ली गुरूच्या हाती
गुरूनं घडविला महानंदी
ते नेला हो पोळ्यामंदी,
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव आभाळ गडगडे, शिंग फडफडे
शिंगात पडले खडे,
तुही माय काढे तेलातले वडे
तुया बाप खाये पेढे
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव सत्तेत आली काशी, पण विमान सदा आकाशी
म्हणे प्यारे देशवासिंयो, लाऊंगा काळे धन मै
तुम ना रहोंगे उपाशी
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव शेतकऱ्यायले देल्ल पीक कर्ज
भरतच आहो आम्ही अजून अर्ज
सरकारनं आम्हाले दावणी बांधलं
तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आणलं
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ
महादेव उदंड झाले पीक पण हातावर तुरी
गोड बोलून आमच्या छातीत खुपसली सुरी
घोषणेचा सुकाळ, कृतीचा दुष्काळ
देवे इंद्रा तुझ्या राज्यात कसा आला काळ
एक नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव
जो तो जाये कॉन्व्हेंटकडे
मराठी वाचतानी अडखडे
तरी त्याचं ध्यान इंग्रजीकडे
अगाऊ कामानं मास्तर होये वेडे
त्यायलेच पहा लागते खिचडीतले कीडे...
कोणत्याही कामात मास्तरलेच ओढे...
बिनाकामाच्या कामानं मोडे कंबरडे....
एक नमन गौरा पारबती हरबोला महादेव.
चाकचाडा बैलगाडा,
बैल गेला पवनगडा
पवनगडाहून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
गुरूने बनविली चकती
दे माझ्या बैलाचा झाडा
मग जा आपल्या घरा
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…
वाटी रे वाटी खोबर्याची वाटी
महादेव रडे, दोन पैशासाठी,
पार्वतीच्या लुगड्याले दादा छप्पन गाठी, एकनाथभाऊ धावण कां गरिबांसाठी*
भारत चौधरी म्हणतो,
*झालो मी रिकामा, पायाले रुतला काटा
नाही पिकणार यंदा, या धाकापोटी
जीव लागे टांगणीला*
अजय रा. कलोडे म्हणे,
मी करतो पर्हाटीची शेती,
कपाशीवर आली भाऊ बोंड अळी
नागो बुढा म्हणते, अजू, बुडाली रे शेती
जानराव म्हणते, आबा लाव छातीले माती.
इब्लीस विनोद शिद म्हणते,
पोळा रे पोळा, बैलांचा पोळा
तुरीच्या दाळीनं मारला डोळा,
शासन काही देईना
कारण शेतकरी फारच भोळा !
हर बोला, हर हर महादेव
शेतकरी संघटनेचे प्रवक्त व शिघ्रकवी गंगाधर मुटे म्हणाले,
वाडा रे वाडा, शेतकर्यांचा वाडा, शेतकर्यांच्या वाड्यात चांदीचा गाडा
चांदीच्या गाड्यांवर सोन्याचा मोर
मोरावर बसते शेतकर्यांचा पोरं
एक नमन गौरा पार्वती, हर हर महादेव
- तापला रे तापला, एकोपा तापला
एकोपा तापल्यावर, सरकारले झापला
एक जन म्हणे, धरा रे धरा,
चांगलं करकचून धरा
अगुदर दे म्हणा, आमचं आरक्षण
मंग जा तू आपल्या घरा...
हर बोला, हर हर महादेव...
पंकज पराते म्हणे,
घे उदी, होय सुधीर यावे म्हणते हो नरेंद्र मोदी, त्यांच्या पाठीशी रामा
कोणी म्हणे, पंजा येते, कुणी म्हणे सेना येते
मोदीनं केले दरसाल खात्यात सहा हजार जमा
एक नमन गौरा पार्वती, हर बोला, हर हर महादेव