कोरची प्रतिनिधी (BEMR-15 KORCHI) :- कोरची येथील मुख्य बाजार चौकात बौद्ध समाजाचे मागील ७० ते ७५ वर्षांपासून पंचशील ध्वज (झेंडा) असून या परिसरात कोरची नगरपंचायत प्रशासनाकडून बाजार संकुल बांधकाम करण्यात येत असून या बांधकामाचे दोन कॉलम या ठिकाणच्या चबुतऱ्यावर येत असल्याने येथील बौद्ध समाजातील बांधवांनी बांधकाम थोड मागील मोकडी जागेत सरकवून करण्यास विनंती केली असुन याविषयी नगरपंचायत सभागृहात दोन ते तीनदा बैठक झाली परंतु नगरपंचायत प्रशासन ह्याचा तोडगा काढत नसल्याने येथील बौद्ध बांधवांनी १८ सप्टेंबर ला गडचिरोली जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करत समस्यांचे निवारण करण्यासाठी निवेदन दिले आहे.
कोरची येथील बौद्ध समाज बांधवांच्या समस्या मार्गी लावा; गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना यांची थेट भेट | Batmi Express
कोरची शहरातून तहसील ऑफिस रोड व बाजार चौकच्या ठिकाणी सदर बौद्ध (झेंडा) चबुतरा असून येथे अनेक वर्षांपासून बौद्ध बांधव समाजातील विविध कार्यक्रम करीत आहेत. त्यामुळे येथील बांधवांचे भावना जुडून आहेत. नगरपंचायत प्रशासन सदर समस्याचे योग्य तोडगा काढत नसल्याने येथील बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदन देताना अखिल भारतीय रिपब्लिक पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, गडचिरोली जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, बी आर एस पी जिल्हा संयोजक राज बंसोड, शेकाप जिल्हा सचिव रामदास जरापे, माकपा जिल्हा सचिव अमोल मारकवार, गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रशांत मडावी, बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्या वीभा उमरे मॅडम, कोरची बौद्ध समाज अध्यक्ष गिरधारी जांभुळे, सचिव शालिकराम कराडे, सहसचिव चंद्रशेखर अंबादे, सदस्य रमेश सहारे, चेतन कराडे, अविनाश हुमने, चंदू वाल्दे, राहुल अंबादे, प्रशांत कराडे उपस्थित होते.