चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू तर एक महिला जखमी.! | Batmi Express

Be
0

Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Chandrapur Live,Chandrapur Lightning Strike,

सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यात दुपारी  2 ते 3 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकळासह झालेल्या पावसात शेत शिवारात धान पिकाची कामे करण्याकरिता गेलेल्या महीलावर वीज कोसळल्याने एक महिला ठार तर एक महीला गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली. शेतकरी व मजूर वर्ग धास्तावलेला आहेत. मृतक महीलेचे नाव महानंदा मोतीराम (वय 64 वर्ष) असे आहे तर जखमी महीलेचे नाव रोशना प्रफुल्ल गेदाम (वय 35 वर्ष) असे आहे . जखमी महीलेले सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविले आहे .

सिंदेवाही तालुक्यातील सिरकड़ा शेतशिवारात दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास विज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद  घटना घडली असून सदर महीला सिरकाडा - प्रदीप यादव बोरकर यांच्या शेतावर धान पिकाची कामासाठी महीला गेल्या होत्या . दुपारच्या सुमारास अचानक पणे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने वातावरणातील बदलामुळे घराकडे जाण्याच्या तयारीत व आश्रय शोधत असतांना दोन महीलावर विज कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महीला गंभीर जखमी झाली . दुःखद घटनेमुळे कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे . परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गावात शोककळा पसरली आहे. 

Note: News is updating by be dept. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->