भंडारा: नियुक्तीपत्र मिळताच उमेदवारांमध्ये आनंद नगर परिषदेत 11 उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नोकरी | Batmi Express

career,Bhandara,jobs,Bhandara Live,Bhandara Today,Bhandara Batmya,

career,Bhandara,jobs,Bhandara Live,Bhandara Today,Bhandara Batmya,

भंडारा, दि.11:
शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळविण्यासाठी बरेचदा नियम व कागदपत्रांच्या पूर्ततेच उमेदवारांचा बराच वेळ जातो.नेहमीच बैठका व चर्चासत्रांनी जिल्हाधिका-यांचे दालन गजबजलेले असते. आजही वर्दळ होतीच. आज मात्र त्या वर्दळीत कृतज्ञतेचा गोडवा होता.अनुकंपा तत्वावरील 11 उमेदवारांना जिल्हाधिकार-यांनी नियुक्तीपत्र देताच आनंद वाटला. अर्थात उमेदवारांनी ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांचे आशिर्वाद घेतले.

कार्यालयाच्या स्तरावरील सामायिक प्रतीक्षा यादीमधील जेष्ठतेनुसार गड क व गड संवर्गातील 11 उमेदवारांना आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी सहआयुक्त नगरपालीका प्रशासन सिध्दार्थ मेश्राम,मुख्याधिकारी विवेक मेश्राम, मंगेश वासेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी रूजु झाल्यानंतर महसूल विभागातील अनुकंपा तत्वावर 8 उमेदवारांना महसूल सप्ताहात नियुक्तीपत्र दिली ,त्यानंतर आज नगरपालीकेतील 11 अनुकंपाधारकांनाही थेट हातात नियुक्तीपत्र दिली. त्यामुळे नगरपालीका प्रशासनाची 2009 ते 2015 पर्यतची अनुकंपाधारकांची यादी आता संपली आहे.

आज भारती मेश्राम,मो.अलतमस इकबाल अहमद ,सतीश ठाकुर,रूपाली पारधी,धम्मदीप खोब्रागडे, दिगंबर मोहनकर,दुर्गेंश तांडेकर,संदीप टेंभरे,कोमल बन्सोड,विजय बेले,अतुल कोल्हे यांना लिपीक ,सहायक ग्रंथपाल,वीजतंत्री,तारतंत्री,पंप ऑपरटर ,जोडारी,शिपाई या पदावर नियुक्तीपत्रे देण्यात आली.
शासकीय सेवा ही चांगल्या पध्दतीने करा व नगरपालीकांना तुमच्या गुणवत्तेने अधिक लोकाभीमुख बनवा अशी अपेक्षा जिल्हाधिका-यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.