ठाणे: बहीण-भावाचं नातं अतिशय पवित्र मानलं जात. पण याच बहीण-भावाच्या नात्याला काळिमा लागलं तर काय ? एका 18 वर्षीय सख्या भावानं 15 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर राहत्या घरातच बलात्कार केल्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये आरोपी भावावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यात मध्ये उघडीस आली आहे.
या घटनेत सख्ख्या भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर लैगिंक अत्याचार करून तिला गरोदर केलं असल्याचे समोर आले आहे. भयभीत झाल्यानं तिनं घडलेला प्रकार कोणाला सांगितला नव्हता. त्यामुळं आरोपी भावानं तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एक दिवस पीडितेला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी पीडिता गभर्वती असल्याचं तिच्या तपासणी अहवालात दिसून आलं. त्यामुळे या घटनेनं कुटुंबाला धक्काच बसला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.