तळोधी: भीषण अपघातात युवक जागीच ठार | Batmi Express

Be
0

Talodhi,Talodhi Live,Talodhi News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur  News,Chandrapur Accident News,

तळोधी बा. : तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव जवळील डांबर प्लांट जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना साडेसात वाजताच्या सुमारास शनिवारी सायंकाळी घडली. मृत पावलेल्या युवकाचे नाव प्रशांत नरेंद्र मेश्राम (२४) असे असून तो सावरगाव जवळील चिखलगाव येथील रहिवासी आहे.

हे देखील वाचा:


प्रशांत मेश्राम हा पाहुण्यांना सावरगाव बस थांब्यावर सोडून देऊन नागपूर - चंद्रपूर महामार्गवरील दक्षिणेस चिखलगाव कडे (एम एच ३४, ई ०४४६) दुचाकीने जात होता. दरम्यान येथील डांबर प्लांट जवळील भागात जागीच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती तळोधी पोलिसांना कळविताच घटना स्थळ गाठून त्यांनी मृतास शव विच्छादना करिता नागभीडला हलविले. अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सहदेव गोवर्धन करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->