वडसा: जुनी वडसा येथील 26 वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने मृत्यू | Batmi Express

wadsa,crime news,Gadchiroli,Wadsa News,Gadchiroli Batmya,Desaiganj,

वडसा
:- नगर परिषद हद्दीत येणाऱ्या जुनी वडसा येथील २६ वर्षीय तरुणाचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना आज १३ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चव्हाण वार्ड, रा. जुनी वडसा येथील २६ वर्षीय तरुण अनिकेत खंडाळे रात्री अंदाजे १२ ते १ वाजेच्या सुमारास लघु शंकेस उठला असता; पायाला काहीतरी दंश केला असल्याची त्याला जाणीव झाली. मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. नंतर काही वेळाने प्रकृती बिघडू लागल्याने वडसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशातच प्रकृती खालावल्याने अखेर आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मावळली.

हे देखील वाचा:

अनिकेत मृत्यू पावल्या नंतर घरीच दांड्या काडीचा साप दिसला व त्याला मारण्यात आले. अनिकेत मोल मोजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. नुकतेच काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी व परिवार असल्याने त्याला शासनाकडून काही मदत मिळावी, यासाठी गोर गरीब जनता- जनार्दन यांसाठी रात्रंदिवस झटणारे माजी नगरसेवक सचिन खरकाटे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनिकेत खंडाळे मृत पावल्या प्रकरणी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.