गडचिरोली: सुरजागड लोहखाणीत मोठा अपघात, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Accident,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli

गडचिरोली:-
 जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखाण उत्खनन करताना मोठा अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना ६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली. 

सोनल रामगीरवार (वय २६, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरयाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरयाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरू आहे. या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळले. तेथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार व अन्य दोघे ठार झाले.


दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



वर्षभरपूर्वीच झाला होता विवाह:

या घटनेत मयत झालेले अभियंता सोनल रामगीरवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती झाल्यावर धक्का बसला. नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.