विद्युतचा करंट लागून मृत्यू | Batmi Express

Chimur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

Chimur,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,

चिमूर:-
 शंकरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संजय मनिराम नन्नावरे (वय 40 वर्षे) यांचा आर ओ प्लांट मध्ये असतांना करंट लागल्याने मृत्यू झाला आहे तर त्याच्या सोबत असलेला मुलगा गँभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी 5 जून दुपारी एक वाजता घडलेली आहे. संजय नन्नावरे (वय 40 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे.


हे देखील वाचा:

चंद्रपूर: वरोरा शहरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

प्राप्त माहितीनुसार, शंकरपूर येथे आरो फिल्टर प्लांट आहे हा प्लांट ग्रामपंचायत सदस्य संजय नन्नावरे दोन वर्षांपासून चालवित होते. शनिवारी आरो फिल्टर प्लांट चे सर्व कामे आटोपून अमन सुधाकर बारेकर (16) सोबत प्लांट बंद करण्यासाठी चॅनल गेट ला हात लावले असता तिथेच त्यांना विद्युतचा करंट लागला त्यात दोघी खाली पडले लगेचच आजूबाजूचे लोक जमा झाले त्यानीच विद्युत प्रवाह बंद करून दोघांनाही शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले संजय हे गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले परंतु तिथेच त्यांचा मृत्यू झाला तर अमन बारेकर हे गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या अश्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नन्नावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.