नवी दिल्ली:- नुकतेच काही दिवसांपूर्वी 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागले. अशा वेळी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची स्पर्धा सुरु आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विविध भागांतील एकूण 20 विद्यापीठे 'बोगस' म्हणून घोषित केले आहे. आयोगाने पुढे म्हटले आहे की अशा 'बोगस' विद्यापीठांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही. मार्च महिन्यात UGC द्वारे ओळखल्या गेलेल्या सर्वाधिक बोगस विद्यापीठे दिल्लीतील आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या लिस्ट मध्ये नागपूर चा पण समावेश आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात. मात्र प्रवेश घेताना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली. “सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 20 विद्यापीठं यूजीसीच्या नियमांचं उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही”, असं पत्रक यूजीसीने जारी केलं आहे.
UGC Big Action: युजीसी ने जारी केली 20 बनावट विद्यापीठांची यादी, लगेच बघा तुमचं विद्यापीठ आहे कि नाही? | Batmi Express
नवी दिल्ली:- नुकतेच काही दिवसांपूर्वी 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागले. अशा वेळी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची स्पर्धा सुरु आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विविध भागांतील एकूण 20 विद्यापीठे 'बोगस' म्हणून घोषित केले आहे. आयोगाने पुढे म्हटले आहे की अशा 'बोगस' विद्यापीठांना कोणतीही पदवी प्रदान करण्याचा अधिकार नाही. मार्च महिन्यात UGC द्वारे ओळखल्या गेलेल्या सर्वाधिक बोगस विद्यापीठे दिल्लीतील आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. या लिस्ट मध्ये नागपूर चा पण समावेश आहे. बारावीनंतर अनेक विद्यार्थी विविध कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतात. मात्र प्रवेश घेताना संबंधित कोर्सला मान्यता आहे का, याची पडताळणी होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यूजीसीने बोगस विद्यापीठांची यादीच जाहीर केली. “सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 20 विद्यापीठं यूजीसीच्या नियमांचं उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही”, असं पत्रक यूजीसीने जारी केलं आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.