गडचिरोली : सर्व प्रथम अल्पवयीन मुलीशी ओळख झाली, त्याचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झालं. प्रेम झाल्यानंतर युवकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना आरमोरी तालुक्याच्या गावातील मात्र कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा पोलिस ठाणे हद्दीत २१ ऑगस्टला उघडकीस आली. दरम्यान, पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभय दिवाकर पदा (वय - १९) रा. बाजीरावटोला, भाकरोंडी असे आरोपीचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय युवतीला अभय याने मैत्री करून त्याचे रूपांतर प्रेमात केले.
युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यावर पीडित मुलीने लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला. त्यानंतर तिने तंटामुक्त समितीकडे धाव घेतली, समितीने पाठवलेल्या नोटीसलाही अभय पदा याने दाद दिली नाही. त्यानंतर पीडितेने मालेवाडा पोलिस ठाण्यात गेली. त्याची तक्रारीवरून बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तपास पोलिस उपनिरीक्षक नारायण राठोड करीत आहेत.
|भद्रावती शहरात आढळले नवजात मृत अर्भक
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.