तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

तरुणाने व्हाॅट्सॲप स्टेट्स वर पेटती चिता ठेवून केली आत्महत्या | Batmi Express

३० वर्षीय तरुणाने आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो ठेवला. गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Sindewahi,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Suicide,suicide,

सिंदेवाही:- 
एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो ठेवला. यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. समाजमन सुन्न करणारी ही घटना सिंदेवाहीत तालुक्यातील रत्नापूर येथे मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश भालचंद्र चावरे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

Sindewahi:- A 30-year-old youth posted a photo of a burning pyre on his WhatsApp status. After this, he committed suicide by jumping into a public well in the village. This shocking incident took place at Ratnapur in Sindewahit taluka on Tuesday around 12 pm. The name of this unfortunate youth is Dinesh Bhalchandra Chawre.

दिनेश चावरे हा सुशिक्षित तरुण. २०२० मध्ये कृषी विभागात कृषिसेवक पदासाठी निवड झाली. निवड झाल्याचे पत्रही मिळाले होते. त्याच कालावधीत त्याला ऑस्टिओमायलिटिस (Osteomyelitis) नावाचा आजार दुर्धर जडला. या आजाराने त्याचा जीव जावू नये, म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्याचा पाय कापावा लागत होता. त्याचा एक पाय कंबरेपासून पूर्णपणे कापला गेला. दोन पायाने धडपडणाऱ्या दिनेशला कुबड्या लागल्या. या आजाराने त्याला असह्य वेदना व्हायच्या. आई- वडिलांनाही हे बघवत नव्हते. या आजारातून मुक्तता व्हावी, म्हणून उपचारावर सुमारे पंधरा लाख रुपये खर्च झाला; परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही यश आले नाही.

घरची परिस्थिती, होणारा खर्च, सततच्या असह्य वेदनेला दिनेश कंटाळला होता. दिनेशने मंगळवारी ६:२३ मिनिटाला आपल्या व्हाॅट्सॲपवर जळत्या चितेचा फोटो अपलोड केला आणि त्याखाली याच्यासाठी, त्याच्यासाठी, नुसताच पळत होता. सगळेच गेले घरी निघून हा एकटाच जळत होता, असा भावनिक संदेश लिहिला. त्याचा अखेरचा हा संदेश कुणालाही कळला नाही. त्याच रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातीलच सार्वजनिक विहिरीमध्ये दिनेशने उडी घेऊन जीवनाशी सुरू असलेला संघर्ष कायम संपवला.
ही घटना उघड होताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याच्या मृत्यूपश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. बुधवारी दुपारी रत्नापूर येथील स्मशानभूमीत दिनेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. होतकरू तरुण मुलाने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.