नागपूर : प्रेमसंबंध तोडल्यामुळे रागात तरुणाने प्रेयसीचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रकाशित केले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुण पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. विजय पृथ्वीराज ठाकरे (वय २५ रा. कळमना) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात तरुणीची फेसबुकवर विजयशी ओळख झाली होती.
या दोघांमध्ये फेसबुकवर ‘चॅटिंग’ सुरू झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. दोन वर्षानंतर विजयचा स्वभाव व इतर कारणांमुळे तरुणीने त्याच्यापासून दुरावा करीत प्रेमसंबंध तोडले. यामुळे विजय रागात आलं होता. विजयने प्रेयसीसोबतचे अश्लील छायाचित्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित केले. प्रेयसीची बदनामी करून तिला धमकीचे मॅसेज पाठवू लागला. तरुणीने घटनेची तक्रार यशोधरानगर पोलिसात केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून विजयला अटक केली.